Aadhar Card Update : आधार कार्ड हे भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने आधार कार्डबाबत काही महिन्यांपूर्वी महत्त्वाची सूचना केली होती. ज्यांनी 10 वर्षांपूर्वी आधार नोंदणी केली आहे आणि त्यात एकदाही बदल केलेला नाही, त्यांनी आधारमधील माहिती अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत सरकारने एक दिलासा दिला आहे. आधारमधील माहिती आता मोफत होणार आहे. 14 जून 2023 पर्यंत सरकारने हा दिलासा दिला आहे.
हे वाचा : कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, यादीत आपले नवा तपासा.
आधार प्राधिकरण अर्थात ‘युआयडीएआय’ने ट्रीट करून माहिती दिली आहे. त्यानुसार, 14 जूनपर्यंत आधार डाक्युमेंट अपडेट करण्याची सुविधा मोफत केली आहे. हा बदल डिजिटल इंडिया मोहिमेंतर्गत (Free Aadhar Card Update) करण्यात येत आहे. ‘आधार’ 10 वर्षांपूर्वी काढले असून त्यात कधीही अपडेट केली नसल्यास ओळखपत्र आणि रहिवासाचा पुरावा अपलोड करणे आवश्यक आहे. अन्यथा सरकारी लाभांपासून वंचित राहावे लागेल.
Aadhar Card Update
‘आधार कार्ड’ अपडेटसाठी
इथे क्लिक करा
आधी होते 50 रुपये शुल्क
- ‘आधार’ अपडेट 1 करण्यासाठी 50 रुपये शुल्क आकारण्यात येत होते.
- मात्र, 10 वर्षामध्ये एकदाही ‘आधार अपडेट’ झाले नसल्यास आता मोफत कागदपत्रे अपलोड करून अपडेट करता येणार आहे.
- नाव, पत्ता किवा जन्म तारखेत बदल करायच असल्यास नियमित शुल्क द्यावे लागेल.
- मोफत अपडेट करण्याची सुविधा केवळ माय आधार पोर्टलवर आहे.
- ‘आधार’ केंद्रांवर 50 रुपये शुल्क द्यावे लागेल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.