Agriculture Loan Scheme : खरिपात कपाशीला हेक्‍टरी 60 हजार पीककर्ज.

Agriculture Loan Scheme : खरीप हंगामाला अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना खरीप पीककर्ज (Crop Loan) वाटपाचे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यानुसार सोयाबीनकरिता 51, तर कपाशीकरिता 60 हजार रुपये प्रती हेक्‍टर दराने कर्ज मिळणार आहे.

हे वाचा : खतांच्या किंमती वाढणार की कमी होणार ? जाणून घ्या.

खरीप हंगामाच्या सरासरी दोन महिने आधीच पीककर्जाचे दर (Crop Loan Rate) निश्‍चित केले जातात. यंदा मात्र त्याकरिता विलंब झाला आहे. त्यामुळे दर निश्चितीपूर्वीच काही बॅंकांनी कर्जवाटप सुरू केले होते. राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत कर्जाचे टार्गेट निश्‍चित करण्यात आले होते.

Agriculture Loan Scheme

कोणत्या पिकाला किती पीककर्ज
इथे क्लिक करून पहा

त्यानुसार जिल्ह्याकरिता यंदाच्या खरिपात कर्जवाटपासाठी 1450 कोटी रुपयांचे लक्षांक देण्यात आले आहे. त्यासोबतच तांत्रिक गट सभेने निश्‍चित केलेले दर बॅंकांनी स्वीकृत केले आहेत. यामध्ये सोयाबीनला हेक्‍टरी 51 हजार, तर कपाशीकरिता 60 हजार रुपयांचा दर पीककर्जाकरिता निश्‍चित करण्यात आला आहे.

Leave a Comment