Agriculture Mechanization Scheme : यांत्रिकीकरण योजनांचे एकत्रीकरण.

Agriculture Mechanization Scheme : शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणासाठी अनुदान वाटण्यासाठी अनेक योजनांची गर्दी झाल्यामुळे कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी सर्व योजनांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. राज्यात शेतीच्या यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना राज्याच्या एका व केंद्राच्या विविध योजनांमधून अनुदान वाटले जाते.

हे वाचा : खरिपात कपाशीला हेक्‍टरी 60 हजार पीककर्ज.

यात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत यांत्रिकीकरण प्रकल्प, एकात्मिक फलोद्यान विकास (एमआयडीएच), राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, पोकरा, स्मार्ट अशा योजनांचा समावेश होता. मात्र चालू वर्षापासून केंद्राने धोरण बदलले आहे.

Agriculture Mechanization Scheme

शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप केवळ उपअभियानातून केले जाणार आहे. अर्थात, केंद्राने हा बदल केला असला तरी राज्य शासनाने कोणताही धोरणात्मक बदल केलेला नाही. त्यामुळे यांत्रिकीकरणातील राज्य पुरस्कृत योजना आहे यापुढेही चालू राहणार आहे. परिणामी, यंदा यांत्रिकीकरण अनुदान वाटपासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत अशा दोनच योजना उपलब्ध असतील.

Leave a Comment