Mechanization Subsidy : कृषी यांत्रिकीकरणासाठी 35 कोटींचे अनुदान.

Mechanization Subsidy : कृषी अवजारांच्या खरेदीसाठी सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान (Subsidy To Farmer) देण्यात येते. यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, कृषी यांत्रिकीकरण उप अभियान तसेच राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण रावविले जाते.

हे वाचा : आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची लॉटरी जाहीर.

या अंतर्गत 2022-23 साठी पुणे जिल्ह्यातील कृषी अवजरांच्या खरेदीसाठी 34 कोटी 33 हजार रुपये अनुदान (Subsidy For Agriculture) वितरित करण्यात आले आहे. याचा जिल्ह्यातील सहा हजार 134 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.

Mechanization Subsidy

योजनेंतर्गत मिळणारी यंत्रे अवजारे

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- पौष्टिक तृणधान्य पिके, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-कडधान्य पिके, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, कृषी यांत्रिकीकरण उप अभियान आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत त्या त्या बाबीमध्ये समाविष्ट यांत्रिक अवजारांच्या खरेदीसाठी अनुदान स्वरुपात अर्थसहाय्य थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा केले जाते.

तालुकानिहाय लाभार्थी आणि अनुदान

Leave a Comment