Agriculture Subsidy अतिवृष्टीचे 58 कोटी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Agriculture Subsidy : अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप (Subsidy) सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत (District Central Cooperative Bank) या परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, पाथरी, पूर्णा तालुक्यांतील 66 हजार 82 शेतकऱ्यांच्या खात्यावर 58 कोटी 38 लाख रुपये एवढे कृषी अनुदान जमा करण्यात आले, अशी माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली.

तालुकानिहाय अनुदान वितरण
पाहण्यासाठी इथे क्लीक करा

2022 च्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधील परतीच्या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, पाथरी, पूर्णा या चार तालुक्यांतील 92 हजार 737 बाधित शेतकऱ्यांच्या 56 हजार 175 हेक्टरवरील जिरायती पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने आर्थिक मदत देण्यासाठी 76 कोटी 39 लाख 80 हजार रुपये निधी डिसेंबर महिन्यात मंजूर करण्यात आला.

Agriculture Subsidy

हे वाचा : कापसाच्या उत्पादनात 35 ते 40 टक्के घट, दर कधी वाढणार.

तालुकानिहाय अनुदान वितरण
पाहण्यासाठी इथे क्लीक करा

Leave a Comment