Agriculture Subsidy Online : त्यात परभणी तालुक्यातील 42 हजार 118 बाधित शेतकऱ्यांच्या 27 हजार 274 हजार हेक्टरवरील पीक नुकसानीबद्दल 37 कोटी रुपये, सेलू तालुक्यातील 8 हजार 626 शेतकऱ्यांच्या 5 हजार 482 हेक्टरवरील पीकनुकसानीबद्दल 7 कोटी रुपये,पाथरी तालुक्यातील 10 हजार 143 शेतकऱ्यांच्या 7 हजार 162 हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीबद्दल 9 कोटी 74 लाख रुपये, पूर्णा तालुक्यातील 31 हजार 850 शेतकऱ्याच्या 16 हजार 257 हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीबद्दल 22 कोटी 10 लाख रुपये निधीचा समावेश आहे.
परंतु हा निधी जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. पीक नुकसानीबद्दल (Crop Damage) प्रतिहेक्टरी 13 हजार 600 रुपये मदत 3 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत दिली जात आहे. संबंधित तलाठ्यांनी तयार केलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या यादीनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) प्रणालीद्वारे बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जात आहे.
Agriculture Subsidy Online
तालुकानिहाय अनुदान वितरण
तालुका | वितरित रक्कम |
परभणी | 2467127.94 |
सेलू | 5009 3.19 |
पाथरी | 12491 8.53 |
पूर्णा | २४९११ १८.७० |