Anandacha Shida : गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १०० रुपयांत आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र, पाडव्याला आनंद शिधा उपलब्ध न झाल्याने लाभार्थ्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे ‘आनंदाचा शिधा वाट पाहिली असती तर पाडव्याला उपवास घडला असता’ अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली. राज्यभरातील लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाने आनंदाचा शिधा उपलब्ध करण्याचे नियोजन आखले.
हे वाचा : महाराष्ट्रातील या 15 जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता.
मात्र, लाभार्थ्यांना ऐन सणावळीतही शिधा मिळाला नाही. परिणामी, अजूनही या शिधेची प्रतीक्षा लागूनच आहे. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना या शिधाचा लाभ मिळणार आहे.दोन दिवसांत साठा उपलब्ध होईल. त्यानंतर एप्रिलमध्ये शिधा वाटप सुरू होईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
Anandacha Shida

100 रुपयांत काय काय मिळणारं
अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच राज्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील केशरी शिधा पत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळणार होता. मात्र शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात जळगावचा समावेश नाही. त्यामुळे अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब या दोनच घटकांना या शिधाचा लाभ मिळणार आहे.