Anandacha Shida : कोणाला मिळणार आनंदाचा शिधा ?

Anandacha Shida : गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यातील रेशन कार्ड धारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा मिळणार आहे. हा लाभ अंत्योदय व प्राधान्य कुटुंब कार्डधारक असणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्यानुसार प्राधान्य गटात 4 लाख 77 हजार 998 तर अंत्योदय कार्डधारक 1 लाख 37 हजार 115 जणांना या शिधाचा लाभ घेता येणार आहे.