Anganwadi Bharti 2023 : राज्यात 20 हजार अंगणवाडी सेविका भरती.

Anganwadi Bharti 2023 : राज्यात लवकरच 20 हजार अंगणवाडी सेविकांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्याशिवाय अंगणवाडी सेविकांच्या पगार वाढ, अंगणवाड्यांसाठी वर्ग, नवीन मोबाईल इ. विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झालेल्या बैठकीत सांगितले.

हे वाचा :

शेतीसाठी विहीर खोदताय, मग असं मिळवा 4 लाख रु अनुदान.

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त तसेच राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Anganwadi Bharti 2023

राज्यात 20 हजार अंगणवाडी सेविका भरती
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी LIC कडे सरकारने 100 कोटी रुपये दिले आहेत. या संदर्भातील प्रलंबित प्रकरणांवर लवकर कार्यवाही करुन संबंधितांना पैसे देण्यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांनी यावेळी दिल्या.
अंगणवाडी सेविकांच्या 20 हजार पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Leave a Comment