Nuksan Bharpai : राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून शेतकर्यांना नुकसान भरपाई दिली जाते. नुकसान भरपाई दिली जात असताना तलाठी शेतकर्यांची वैयक्तिक माहिती जसे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, जमिनीची माहिती इ. यादी बनवून तहसिलदार यांना दिली जाते.
तलाठी यांनी दिलेल्या यादी नुसार शेतकर्यांच्या खात्यात तहसिलदार नुकसान भरपाई जमा करतात. नुकसान भरपाई जमा करत असताना काही शेतकऱ्याची माहिती चुकतो यामुळे मदत मिळण्या पासून विलंब होतो. म्हणूनच आता अतिवृष्टी नुकसान भरपाई नवीन पद्धतीने जमा करण्यात येईल.
Nuksan Bharpai
नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीपिकांचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना मदत निधी यापुढे प्रचलित कार्यपध्दतीनुसार वितरीत न करता MAHA IT यांचेकडून विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीनुसार खालीलप्रमाणे कार्यपध्दतीने वितरीत करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे.
- तहसीलदार हे पात्र शेतकऱ्यांची सर्वमाहिती Excel format मध्ये भरून, MAHA IT या कंपनीकडे दिलेल्या लॉगीनद्वारे तयार केलेल्या पोर्टल वर पाठवतील.
- तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीचे संगणकीय प्रणालीवर संस्करण करण्यात येईल. ज्या माहितीमध्ये त्रुटी आहेत (बँक खाते नंबर) ती चूक दूर करण्यासाठी तहसीलदार यांना संगणकीय प्रणालीवर दर्शविण्यात येईल.
- पात्र लाभार्थ्यांचे नाव, बाधीत क्षेत्र, मदतीची रक्कम इ. माहिती दर्शविणारी विशिष्ट क्रमांक यादी संगणकीय प्रणालीवर तयार करण्यात येईल.
- विशिष्ट क्रमांक यादीतील लाभार्थी यांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे जाऊन त्यांची आधार क्रमांकाद्वारे बायोमेट्रिक ओळख पटविणे आवश्यक राहिल.
- त्यानंतर लाभार्थ्याच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल.