Ativrushti Nuksan Bharpai : या जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर.

Ativrushti Nuksan Bharpai : राज्यात या वर्षी खरीप हंगामात जुन ते ऑगस्ट आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत जाहीर केली होती. ज्याचे वाटप बर्‍याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाईचे (Ativrushti Nuksan Bharpai) वाटप झाल्यानंतर ज्या शेतकर्‍यांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे, त्यांच्या याद्या संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश शासन निर्णयाद्वारे देण्यात आले होते. तर आता बर्‍याच जिल्ह्यात लाभार्थ्याना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील संबंधित जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Ativrushti Nuksan Bharpai

तर आता धाराशीव म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्याची जुन ते ऑक्टोबर २०२२ मधील सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप शेतकऱ्यांची यादी संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर ही अनुदान वाटप यादी तुमच्या मोबाईलवर कशी डाऊनलोड करता येईल, चला पाहुयात.

  • सर्वप्रथम तुम्हाला उस्मानाबाद (धाराशीव) जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. – https://osmanabad.gov.in/mr/
  • इथे आल्यनंतर सर्वात वरील टॅब मध्ये सुचना हा विभाग दिसेल. त्यावर क्लिक करावे.
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तीन पर्याय येईल, त्यापैकी घोषणा या पर्यायावर क्लिक करावे.
  • घोषणा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर माहे जुन ते ऑक्टोबर २०२२ मधील सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप (शेतकऱ्यांची यादी) तर या घोषणेसामोरील पहा या पीडीएफ पर्यायावर क्लिक करून आता तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी डाऊनलोड करू शकता.

Leave a Comment