Bajar Bhav : पिकांचे आजचे बाजार भाव.

Bajar Bhav

सोयाबीन (soybean market)
गेल्या सप्ताहात सोयाबीनची (Bajar Bhav) स्पॉट किमत (इंदूर) रु. ५, ६२४ वर आली होती, या सप्ताहात ती २.५ टक्क्यांनी घसरून रु. ५,४८४ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.

तूर (tur market)
तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात ०.७ टक्क्याने घसरून रु. ६,७९१ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.

कांदा (onion market)
कांद्याच्या किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या. कांद्याची किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,४२२ होती. या सप्ताहात ती रु. १,३३० वर आली आहे.

मूग (mug market)
मुगाच्या किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात रु. ७,१५० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. सध्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत.

हरभरा (harbhara market)
हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती गेल्या सप्ताहात ५.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,९७३ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.७ टक्क्याने वाढून रु. ५,००६ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे.

हळद
हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात त्या १ टक्का घसरून रु. ७,४४१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी घसरून रु. ७, ३७७ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. ७,९२४ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती रु. ८,०३० वर आल्या आहेत.

Leave a Comment