Bank of India : बँक ऑफ इंडियात ऑफिसर होण्याची संधी.

Bank of India : बँक ऑफ इंडिया या अग्रगण्य बँकेत 500 पदांच्या प्रोबेशनरी ऑफिसरच्या भरतीसाठीची प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाइन पद्धतीने 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत www.bankofindia.co.in या संकेतस्थळावरून अर्ज करायचा आहे.

यात क्रेडिट ऑफिसरसाठीच्या 350 पदांची भरती व आयटी ऑफिसरच्या 150 पदांच्या भरतीसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

Bank of India

शैक्षणिक पात्रता

  1. क्रेडिट ऑफिसर पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर
  2. आयटी ऑफिसर पदासाठी कम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स या शाखेतील बीई किंवा बी.टेक

परीक्षा शुल्क 

  • 850 रुपये (अनुसूचित जाती, जमातीच्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क रुपये 175 )

वयोमर्यादा

  • किमान 20 वर्ष कमाल 29 वर्ष (मागासवर्ग प्रवर्गासाठी कमाल 34 वर्ष)
पहिल्या टप्प्यात 

ऑनलाइन संगणकीय चाचणीत पाच घटकांवर प्रश्न विचारले जातील.

घटक                                                  प्रश्न       गुण    वेळ
इंग्रजी 35  40   40 मिनिटे
अभियोग्यता व संगणकीय चाचणी  45 60   60 मिनिटे
सामान्य अर्थशास्त्रीय व बँकिंग ज्ञान 40 40 35 मिनिटे
डेटा अॅनालिसिस     3560   45 मिनिटे
इंग्रजी दीर्घोत्तरी पत्र व निबंध लेखन22530 मिनिटे
दुसऱ्या टप्प्यात गट चर्चा

    इंग्रजी शिवाय इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी व हिंदी माध्यमातून असेल, प्रत्येक चुकीच्या उत्तराला निर्धारित गुणांच्या 2/4  गुण वजा केले जातील. लेखी परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात गट चर्चेसाठी बोलवण्यात येईल.

गटचर्चा या दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 40 गुण

    गटचर्चा या दुसऱ्या टप्प्यात यशस्वी उमेदवारांची 60 गुणांची वैयक्तिक मुलाखत होईल. लेखी परीक्षा, गटचर्चा व मुलाखतीत मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे विद्याथ्र्यांची बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड होईल.

Leave a Comment