Borewell Yojana : महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक शासकीय योजनांतर्गत अनुदान वितरित केली जात आहेत. शेतकऱ्यांना सिंचनाच्या माध्यमातून अधिकाधिक पिके घेता यावीत आणि शेतकऱ्यांच्या नफ्यातही वाढ व्हावी यासाठी राज्यात अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे बोअरवेल योजना.
हे वाचा : सिबिल स्कोअरमुळे कर्ज मिळत नाही, तेव्हा काय करावे ?
सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात बोअरवेल घेण्यासाठी अनुदान दिले जात आहे. सरकारच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर बोअरवेलसाठी 20000 रु. अनुदान दिला जातात. या बोअरवेल अनुदान योजनेसाठी महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदान देत आहे. या योजनेसाठी अल्पभूधारक शेतकरी अनुदानासाठी अर्ज करू शकतात.
Borewell Yojana Maharashtra

इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा
योजनेअंतर्गत पात्रता
- ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात. म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे स्रोत उपलब्ध नाहीत, अशा शेतकऱ्यांना पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करून देण्यासाठी शासन ही योजना राबवत आहे.
- तसेच 0.20 ते 2 हेक्टर जमीन असलेले शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र असतील.
- शेतकऱ्यांनी त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवून स्वावलंबी व्हावे यासाठी ही बोअरवेल योजना राबविण्यात येत आहे.