Business Loan : औद्योगिक विकासासाठी राज्यात तयार करण्यात आलेल्या पोषक वातावरणाचा लाभ महिला उद्योजकांना मिळावा आणि त्यातून महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी विशेष धारण राबविण्याचा निर्णय 2017 मध्ये घेण्यात आला. या अतंर्गत महिला उद्योजकांना 20 लाख 1 कोटींपर्यंत अनुदान देय आहे. जिल्हा ड प्लस वर्गवारीत येत असल्यामुळे येथे 50 लाख अनुदान दिले जाते.
हे वाचा : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा वाटप सुरू.
या योजनेचा लाभ एकल मालकी, भागीदारी, सहकारी क्षेत्र, खासगी किंवा सार्वजनिक मर्यादित घटक आणि स्वयंसहायता बचत गट यांना मिळतो. या घटकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये किमान 50 टक्के महिला कामगार असणे आवश्यक आहे. नवीन उपक्रमांना तालुका वर्गीकरणानुसार देय असलेल्या स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या 15 ते 35 टक्के दराने अनुदान दिले जाते. शिवाय उद्योगांना प्रत्येक युनिट विजेमागे दोन रुपये एवढी सवलत 5 वर्षांसाठी दिली जाते.
Business Loan

अर्ज कसा करावं ?
काय आहे राज्य शासनाचे विशेष धोरण ?
- औद्योगिक विकासासाठी राज्यात तयार करण्यात आलेल्या पोषक वातावरणाचा लाभ महिला उद्योजकांना मिळावा आणि त्यातून महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी विशेष धोरण राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या धोरणामुळे राज्यातील महिला संचलित उद्योगांचे प्रमाणाचा टक्का वाढविणे, रोजगार उपलब्ध करणे हा हेतू आहे.