Cold Weather : दोन दिवसानंतर थंडी परत येणारं, हवामान विभागाने दिले संकेत.

Cold Weather : ढगाळ हवामान, पहाटे पडत असलेल्या धुक्यामुळे (Foggy Weather) राज्याच्या किमान तापमानात (Minimum Temperature) वाढ झाली आहे. राज्यात पहाटे थंडी (Cold Weather) कमी असून, दुपारच्या वेळी उकाडाही (Heat) जाणवत आहे.

हे वाचा : सोयाबीन दरात मोठे बदल, पहा आजचे सोयाबीन बाजार भाव.

राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. दोन दिवसानंतर राज्यात थंडी परतण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

Cold Weather

पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाशापाठोपाठ राज्यात आता दाट धुक्याची दुलई पसरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. परिणामी किमान तापमानात झालेली वाढ कायम आहे.

राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान 11 ते 22 अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानातही वाढ झाली असून, राज्यातील उच्चांकी 34 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढली असून, नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) सक्रिय आहे.

राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान आणि किमान तापमान

कमाल तापमान किमान तापमान
पुणे31.614.9
जळगाव32.714.7
धुळे32.411.4
कोल्हापूर30.918.1
महाबळेश्वर26.414.1
नाशिक29.715.8
निफाड29.39.5
सांगली30.917.3
सातारा31.115.0
सोलापूर33.617.4
रत्नागिरी30.521.3
औरंगाबाद29.811.8
नांदेड17.2
उस्मानाबाद32.516.0
परभणी32.615.8
अकोला33.116.0
अमरावती32.016.4
बुलढाणा32.418.0
चंद्रपूर31.617.2
गडचिरोली31.014.8
गोंदिया32.216.0
नागपूर31.815.7
वर्धा32.216.4
यवतमाळ31.016.2
Weather Report

Leave a Comment