Cooperative Bank : या बँकेच्या थकीत कर्जदारांना शासनाचा मोठा दिलासा.!

Cooperative Bank : राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या कर्जदारांसाठी एकरकमी कर्जफेडी योजनेस 31 मार्च 2024 पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. बँकांचे वाढते एनपीए कमी करण्यासाठी सदर योजनेस मुदतवाढ दिल्याचे गुरुवारी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने स्पष्ट केले आहे.

हे वाचा : बचत करा, पोस्टात ठेवा, ठेवींवर व्याजदर जादा.

जी कर्जे अनुत्पादकच्या संशयित असतील, बुडीत असतील अशा खात्यांना सदर योजना लागू असणार आहे. फसवणूक करून मिळवलेली कर्जे, जाणीवपूर्वक थकवलेली कर्जे किंवा रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला डावलून दिलेली कर्जे या योजनेस पात्र असणार नाहीत, असे शासन निर्णयात म्हटलेले आहे.

Cooperative Bank

👇 👇 👇 👇

50 कोटींहून अधिक रकमेसाठी काय करावे ?

योजनेस पात्र झाल्यानंतर महिन्याच्या आत तडजोडीतील 25 टक्के रक्कम कर्जदाराने बँकांना द्यावी लागेल. उर्वरित 75 टक्के रक्कम समान 11 महिन्यांत अदा करता येणार आहे. तडजोडीची रक्कम निश्चित करण्यासाठी द.सा.द.से. 6 टक्के सरळ पद्धतीने व्याज आकारले जाणार आहे. बँकांनी सदर योजना स्वीकारायची की नाही याचा निर्णय घ्यायचा आहे.

Leave a Comment