Cotton Crop Loan : जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून संकरित कापूस बागायतीसाठी प्रति हेक्टरी 70 हजार रुपये आणि जिरायती सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 59 हजार 400 रुपये कर्ज वाटप दर निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जात आहे. तसेच राज्यातील 2023-24 साठी 1,275 कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यापैकी दि. 8 मे पर्यंत तब्बल 43.49 टक्के कर्जाचे वितरण करण्यात आले आहे.
हे वाचा : अण्णासाहेब महामंडळाची ट्रॅक्टर कर्ज योजना पुन्हा होणार सुरू
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी पीक कर्ज वाटप केले जाते. जिल्ह्याला 2023-24 मध्ये 1,275 कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्या-त्या बँकेला लक्ष्यांक ठरवून देण्यात आला आहे. 1 एप्रिलपासून पीक कर्ज वाटपाला सुरुवात झाली आहे. पीक कर्ज वाटपात सार्वजनिक क्षेत्रातील बँका व खासगी क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर असल्याचे दिसून येते.
Cotton Crop Loan

कोणत्या पिकाला किती कर्ज
इथे पहा
दरवर्षी पीक कर्ज वाटपाला सुरुवात होण्यापूर्वी पीकनिहाय कर्ज वाटपाचे दर निश्चित केले जातात. जिल्हा मध्यवर्ती बँकेने निश्चित केलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले जात आहे. सार्वजनिक बँकांनी हेक्टरी आणि एकरी पीकनिहाय दर निश्चित केले आहेत. बागायती आणि फळ पिकांसाठी सर्वाधिक दर आहे. कोरडवाहू पिकांना कमी पीक कर्ज दर आहे.