Cotton News : कापसाच्या दरांत वाढ होईल, या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची घरातच साठवणूक केली आहे. परंतु, या कापसामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे. बाजारात भाव घटल्याने विक्रीला ब्रेक लागला असून, घरातील कापसामुळे कुटुंबातील सदस्यांना खाजीची लक्षणे दिसून येत असल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
हे वाचा : आता करा फुकटात ‘आधार कार्ड’ अपडेट.
गत वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेने आगर परिसरात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली. संततधार पावसामुळे कपाशीचे उत्पादन होण्याची शक्यता मावळत असतानाच अखेरच्या टप्प्यात बऱ्यापैकी उत्पन्न हाती आले. मात्र, कापसाचे बाजारभाव आठ हजार 500 रुपये क्विंटलच्या आसपास होते.
Cotton News
हे वाचा : स्वस्त कर्ज हवे तर हे काम करा .
यात वाढ होऊन दहा हजार रुपये भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवली. मार्च महिना संपण्याच्या मार्गावर असून, कापसाचे भाव घसरणीवर आहेत. शेतीसाठी घेतलेले पीक कर्ज परतफेडीची तारीख जवळ आली आहे. तर कापसाच्या गंजीजवळ गेल्यास अंगाला खाज येते, अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाले असल्याचे दिसून येत आहे.