आवक 25.65 टक्क्यांनी घटली
Cotton Production In Maharashtra : सन 2021-22 च्या तुलनेत सन 2022-23 मध्ये पहिल्या चार महिन्यांत बाजारपेठेतील कापसाची आवक 25.65 टक्क्यांनी घटली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 1 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर 2022 या काळात कापसाची आवक 10.15 टक्क्यांनी घटली होती. 2 जाने. 2023 पर्यंत 19.58 टक्के, 3 फेब्रुवारी 2023 पर्यंत 24.90 टक्के आणि 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत 25.65 टक्क्यांनी घटली आहे.
Cotton Production In Maharashtra
‘सीएआय’चा अंदाज
कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) ने सन 2022-23 या कापूस वर्षात देशभरात 375 लाख गाठी कापसाचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. बाजारपेठेतील कापसाची घटती आवक लक्षात घेत ‘सीएआयने त्यांचा कापूस उत्पादनाचा अंदाज 375 वरून 365, 365 वरून 344, 344 वरून 339 आणि 13 फेब्रुवारी रोजी 321.50 लाख गाठीवर आणला आहे. सहा महिन्यांत ‘सीएआयचा आकडा आणखी खाली येईल.