Cotton Production : देशातील कापसाचे पेरणी क्षेत्र वाढले असले तरी प्रतिकूल हवामानामुळे उत्पादन किमान 25 ते 40 टक्क्यांनी घटले आहे. ‘सीएआय’ने (CAI) यावर्षी देशात 375 लाख गाठी कापसाचे उत्पादन होणार आहे. तसेच त्यांचा हा आकडा कमी असला तरी उत्पादन 290 ते 300 लाख गाठींवर स्थिरावणार आहे, अशी माहिती बाजारतज्ज्ञांनी दिली.
हे वाचा : शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली सौरऊर्जा.
कापसाचे दर प्रति क्विंटल आठ हजार रुपयांच्या आसपास घुटमळत असून, दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकरी अतिशय संथगतीने कापूस विक्री करीत आहेत.
देशभरात मागील वर्षीच्या तुलनेत सन 2022 – 23 च्या हंगामात कापसाचे पेरणीक्षेत्र 10 लाख हेक्टरने वाढल्याने कापसाच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचा टेक्सटाईल व गारमेंट इंडस्ट्रीजकडून केला जात आहे.
Cotton Production
कापसाचे दर कधी वाढणार
इथे क्लीक करून पहा
- महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व कर्नाटक या मोठ्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये प्रतिकूल हवामान व अतिमुसळधार पावसामुळे कापसाचे नुकसान झाले आहे.
- तर पंजाब, हरयाणा, राजस्थान या छोट्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये गुलाबी बोंडअळीमुळे कापसाचे किमान 35 ते 40 टक्के नुकसान झाले आहे.
- गुजरात, तामिळनाडू व ओडिशा या राज्यांमध्ये कापसाचे उत्पादन समाधानकारक असून, उत्पादकतेत वाढ झाल्याने तेथील शेतकरी व बाजार तज्ज्ञांनी सांगितले.
- 24.30 लाख गाठी कापूस आयात सन 2021-22 मध्ये कापसाचे उत्पादन 307.60 लाख तर वापर 318 लाख गाठींचा होता.
- या काळात 43 लाख गाठी कापसाची निर्यात तर 14 लाख गाठी कापूस आयात करण्यात आला होता. 2022-23 मध्ये कापसाची मागणी व वापर किमान 300 लाख गाठींचा असेल.