Cotton Rate Update : कापूस बाजारात सध्या शेतकऱ्यांकडे किती कापूस शिल्लक आहे, यावरून मतभेद दिसत आहेत. उद्योगांच्या मते शेतकऱ्यांकडे अजूनही जास्त कापूस आहे. त्यामुळं पुढील दीड महीना आवकेचा दबाव असेल. पण देशातील कापूस (Cotton) उत्पादनाचा अंदाज आणि बाजारात आलेला कापूस, यावरून उद्योगांना वाटतं त्याप्रमाणात कापूस शिल्लक नाही, हे स्पष्ट आहे. तसेच पुढील काळात कापूस दरात सुधारणा होईल, असा अंदाज आहे.
हे वाचा : पेट्रोल-डिझेल आणखी महाग ?
कापूस बाजारात सध्या काहीसे चढ उतार सुरु आहेत. मागील आठवड्यात कापूस दरात सुधारणा झाली. त्यानंतर दर काहीसे स्थिरावले. दरात क्विंटलमागं 200 ते 300 रुपयांची सुधारणा झाली. यामुळं कापूस विक्रीही वाढली.दरवाढीची अपेक्षा असणारे, पण जास्त दिवस थांबू शकत नाहीत, असे शेतकरी कापूस विकत असल्याचं व्यापारी सांगत आहेत.
Cotton Rate Update

सध्याची दरपातळी काय ?
सध्या कापूस असलेले अनेक शेतकरी पुढील एक ते दीड महिन्यात कापूस विकतील. पण एकाच दरपातळीवर हा कापूस बाहेर येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळं कापूस दरातही टप्प्याटप्यानं वाढ केली जाईल, असा अंदाज आहे.