Crop Damage Compensation : मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी 9 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. हा निधी लवकरच पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हे वाचा : अल निनोच्या संकटामुळे यंदा पाऊस कसा असणार ?
मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामुळे गहू, चना, संत्रा, मोसंबीसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते. संप काळातही महसूल, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले.
Crop Damage Compensation
- प्राथमिक सर्वेक्षणात सात हजारांवर पिकांचे नुकसान (Nuksan Bharpai) झाल्याचे समोर आले. अंतिम अहवालात हा आकडा 4 हजार 449 हेक्टर होता. दरम्यानच्या काळात शासनाने मदतीच्या रकमेत वाढ केली. खरीप हंगामात अतिवृष्टी व पुराचा फटका शेतकऱ्यांना बसला.
