Crop Loan : शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणं झालं सोपं, ‘सिबिलची’ अट रद्द.

Crop Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज (Agriculture loan) घेण्यासाठीच्या जाचक अटीतून आता शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना यापुढे बँकांना सिबिल स्कोरची (Cibil Score) अट लावता येणार नाही.

हे वाचा : रब्बी हंगामातील ई-पीक पाहणीला मुदतवाढ.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणं सोपं होणार आहे. “पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बॅंकांनी ‘सिबिल’ अथवा ‘सिबिल स्कोअर’चे बंधन घालू नये. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशात त्यासंबंधीचे कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंकांनी सिबिल स्कोअरची अट न लावता शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणारं.

Agriculture Crop Loan

राज्य शासनाचा मोठा निर्णय
येथे क्लीक करून पहा
सहकार विभागाला निर्देश

राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. ही अट रद्द करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार विभागाला (Department of Cooperation) यासंदर्भात निर्देश दिले आहे.

या शासन निर्णयाच्या माध्यमातून अल्प मुदतीत पीक कर्ज देण्यासाठी सिबील अट किंवा सिबील स्कोरचा संदर्भ न देण्याच्या सूचना बँकांना देण्यात आलंय आहेत.

Leave a Comment