Crop Loan Details : रब्बीसाठी पेरण्यांसाठी मिळते शासनाकडून कर्ज, अर्ज सुरू..

Crop Loan Details : शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना खरीप, रब्बी हंगामात पीक कर्जाची उपलब्धता करून दिली जात आहे. चालू खरीप हंगामात एक लाख 20 हजार 970 शेतकऱ्यांना 875 कोटींहून अधिकचे पीक कर्ज (Crop Loan) वाटप करण्यात आले आहे. उद्दिष्टाच्या 70 टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे घेण्यासाठी सावकाराकडे जावे लागू नये यासाठी शासनाच्या वतीने खरीप, रब्बी हंगामात पीक कर्जाची उपलब्धता करून दिली जात आहे.

अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज वेब्धी शासनाच्या वतीनेही सातत्याने पाठपुरावा केला जातो. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका घेतल्या जातात. सततच्या पाठपुराव्यामुळे चालू खरीप हंगामात उद्दिष्टाच्या 70 टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. शिवाय रब्बी हंगामातही उद्दिष्टानुसार पीक कर्जाचे वाटप करावे, याबाबत शासन, प्रशासन स्तरावरून संबंधित बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Crop Loan Details

खरिपासाठी 875 कोटींचे कर्ज वाटपचालू खरीप हंगामासाठी 1249 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आजवर 875 कोटींचे वाटप झाले आहे.

501 कोटींचे उद्दिष्ट

  • खरिपात उद्दिष्टाच्या 70 टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना 501 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले आहे.

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची तयारी

  • खरिपानंतर रब्बी हंगामात उत्पन्न घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक असतो. या हंगामासाठी पीक कर्ज मिळावे म्हणूनही अनेकजण प्रयत्नशील आहेत.

Leave a Comment