Crop Loan Waiver : 17 हजार जणांना ‘प्रोत्साहन अनुदान ‘.

Crop Loan Waiver : पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पात्र 17 हजार 887 शेतकऱ्यांच्या खात्यावर बुधवारी 62 कोटी 63 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. अद्याप 12 हजार 996 शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे.

हे वाचा : कापसाच्या उत्पादनात 35 ते 40 टक्के घट, दर कधी वाढणार.

राज्य सरकारने पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. त्यानुसार जिल्ह्यातील 3 लाख 577 शेतकऱ्यांची माहिती भरली होती. त्यापैकी पहिल्या यादीत 1 लाख 28 हजार पात्र शेतकऱ्यांची यादी आली.

Crop Loan Waiver

त्यापैकी 1 लाख 20 हजार 435 शेतकऱ्यांना 440 कोटी 70 लाख रुपयांचे अनुदान खात्यावर वर्ग करण्यात आले होते. 57 हजार 310 पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 10 हजार 506 शेतकऱ्यांना 39 कोटी 10 लाखांचे अनुदान मिळाले. 

16 फेब्रुवारी रोजी त्यातील 22 हजार 954 शेतकऱ्यांच्या खात्यावर 83 कोटी 89 लाख रुपये वर्ग करण्यात आले. बुधवारी उर्वरित पात्र शेतकऱ्यांपैकी 17 हजार 887 शेतकऱ्यांच्या खात्यावर 62 कोटी 63 लाख वर्ग केले. 

आतापर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 71 हजार 782 शेतकऱ्यांना 625 कोटी 32 लाख रुपये प्रोत्साहन अनुदानाच्या रूपाने मिळालेले आहेत. अद्याप 12 हजार 193 पात्र शेतकऱ्यांचे अनुदान देय आहे.

Leave a Comment