CSMSSY : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान आले ?

CSMSSY : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना लवकरच अनुदान मिळणार. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेतील उर्वरित पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच अनुदान मिळेल, असे सहकारमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या वेळी सांगितले.

हे वाचा : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरासाठी अर्ज केला का ?

या योजनेद्वारे शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ (Karjmafi) होणार आहे. या योजनेद्वारे ज्या शेतकरी बांधवांनी त्यांचे व्याज व हप्ते वेळेवर भरले आहेत, त्यांना राज्य सरकार त्यांच्या एकूण कर्जाच्या 25 टक्के रोख रक्कम देणार आहे. या योजनेद्वारे राज्य सरकार 89 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहे.

CSMSSY

हे वाचा : कुसुम सौर कृषी पंपांचे नवीन दर जाहीर ..!

या योजनेंतर्गत 2015-16 आणि 2016-17 मध्ये घेतलेले पीक कर्ज. दि. 30.6.2016 आणि पीक कर्जाच्या 25% किंवा रु. 25000 नफा दिला जाईल. सदर योजनेत सन 2012-13 ते 2015-16 या कालावधीत थकबाकी असल्यास किंवा पुनर्रचित रक्कम नियमित भरल्यासही शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल. राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतकर्‍यांना दिलेल्या कर्जावर ही कर्जमाफी योजना (Farmer Loan Waiver) लागू होईल.

Leave a Comment