DAP Fertilizer Price : 2023 चा खरिप हंगाम जवळ आला आहे. त्यातच केंद्र सरकारनं खरिप हंगाम 2023 साठी P&K (फॉस्फेट आणि पोटॅश) खतांसाठीचं अनुदान जाहीर केलं आहे. 1 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान हे अनुदान लागू असणार आहे. केंद्र सरकारकडून राखायनिक खतांवर NBS (Nutrient Based Subsidy) या योजनेअंतर्गत अनुदान दिलं जातं.
हे वाचा : कांदा चाळीसाठी सरकार देणार दिड लाख रु अनुदान.
भारतात सर्वाधिक वापर यूरिया या खताचा केला जातो. सगळ्या खत उत्पादक कंपन्यांची (Urea Fertilizer Price) यूरियाची 45 किलोची एक बॅग शेतकऱ्यांना 266 रुपयांनाच मिळत आहे. तर 50 किलोची बॅग 295 रुपयांना मिळत आहे. डीएपी खताची 50 किलोची एक बॅग साधारणपणे 1350 रुपयांना मिळत आहे.
DAP Fertilizer Price

खतांचे नवीन दर काय ?
इथे पहा नवीन दर
- केंद्र सरकारनं निर्देश दिल्याप्रमाणे, सध्याच्या दरानुसारच खत मिळणार आहे. पण, सामान्यपणे सरकारनं अनुदान घोषित केल्यानंतर खत उत्पादक कंपन्या (Fertilizer Company) खतांच्या किंमती जाहीर करत असतात.