Digital 7/12 : जमिनीच्या सातबाच्यासह, आठ अ उतारा, फेरफार उतारा, मिळकत पत्रिका आता ऑनलाइन भेटू लागल्या आहेत. एका क्लिकवर ही सेवा उपलब्ध झाल्याने ग्रामीण जनतेला मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापासून मुक्तता मिळाली आहे. वेगवेगळ्या गट क्रमांकामध्ये विभागलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनींची माहिती एकत्रितपणे 8-अ म्हणजेच खाते उतायावर नोंदविलेली असते.
हे वाचा : कृषी यांत्रिकीकरणासाठी 35 कोटींचे अनुदान.
तो उतारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. मात्र आता त्याची गरज उरलेली नाही. महाराष्ट्र सरकारनं डिजिटल (7/12 extract) स्वाक्षरीचा 8-अ उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. तसेच सातबारा उताराही सहजच काढता येणार आहे. त्यावरही डिजिटल स्वाक्षरी असणार आहे. तसेच फेरफार उतारा, मिळकत पत्रिका ऑनलाइन ही काढता येते. त्यामुळे आता तहसीलसह तलाठी कार्यालयात जाण्याची गरज उरलेली नाही.
Digital 7/12

सातबारा उतारा ऑनलाइन डाउनलोड
ऑनलाईन शुल्क किती ?
प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड सध्या विनामूल्य आहे आणि याला कोणतेही शुल्क लागू नाही. सातबाच्यासाठी 15 रुपये चार्ज केले जातील, ते तुमच्या उपलब्ध बँक खात्यातून कापले जातील. त्यामुळे सगळ्यात आधी खात्या पैसे जमा करणे गरजेचे असते.