Divyang Loan Yojana : अरे वा ! 50 हजारांपासून पाच लाखांपर्यंत कर्ज !

Divyang Loan Yojana : दिव्यांग व्यक्ती एकूण 21 प्रकारात विभागले आहे. या सर्व प्रकारातील दिव्यांग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी शासनातर्फे 50 हजार ते पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जात आहे. जिल्हा कार्यालयात त्याचे अर्ज उपलब्ध आहेत. योग्य कागदपत्रांसह प्रस्ताव सादर केल्यास कर्ज उपलब्ध होते.

हे वाचा : शेतकऱ्यांना पेरणीसाठी एकरी 10 हजार रुपये द्या.

दिव्यांगांना पाच लाखांपर्यंत कर्ज (Low Interest Rate) दिव्यांग बांधवांसाठी विभागातर्फे दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना, वैयक्तिक थेट कर्ज योजना, हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान अशा योजना असून, त्यासाठी 50 हजार ते 5 लाखापर्यंत कर्ज दिले जाते.

Divyang Loan Yojana

असा करा कर्जसाठी अर्ज

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून व्यवसायासाठी स्टॉल उपलब्ध करण्याची योजना आहे. 40 हजार रुपये लाभार्थ्याला स्टॉल खरेदीसाठी दिली जाते. दृष्टिबाधितासाठी नॅबच्या (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड) माध्यमातून मदत केली जाते. तसेच अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना शाळास्तरावर कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम शिकवले जातात. या विद्याथ्र्यांना संगणक, मोबाइल रिपेरिंग असे प्रशिक्षण दिले जात आहे.

Leave a Comment