E Shram Card : ई- श्रमवर कामगारांची नोंदणी होत असून, या ई श्रम कार्डमुळे स्थलांतर करणाऱ्या कामगारांना ट्रॅक करणे सोपे होणार आहे. कामगारांचा डेटा आणि माहिती एकत्रितरीत्या सरकारला उपलब्ध होणार आहे. कामगारांनी ओळखपत्र आणि आधारकार्डाच्या साह्याने नोंदणी केल्यावर त्यांच्या कामाच्या प्रकाराच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. त्यामुळे त्यांना योग्य त्या सरकारी योजनांचा लाभ देणे शक्य होणार आहे.
हे वाचा : कोणत्या बाजार समितीत कापसाला किती बाजारभाव पहा.
ई श्रम पोर्टलवर सर्व राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंद करावी, असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. ई- श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास केंद्र सरकारकडून त्यांच्या वारसांना विम्याचे कवच देण्यात येणार आहे. अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास भरपाई देण्यात येणार आहे.