Electricity Bill : वर्षानुवर्षे कृषिपंपाची थकबाकी थकविणाऱ्या ग्राहकांसाठी महावितरणतर्फे गेल्या वर्षापासून ‘कृषी धोरण- 2020’ राबविण्यात येत आहे. तीन वर्षांसाठी राबविण्यात येत असलेल्या या धोरणाचे दुसरे वर्ष येत्या 31 मार्चला संपणार आहे. या धोरणाअंतर्गत जे शेतकरी 31 मार्चपर्यंत थकीत वीजबिल भरतील, त्यांना वीजबिलावर 30 टक्के सूट देण्यात येणार आहे.
हे वाचा : या दिवशी पीकविमा जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात.
त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. सरकारने 2021 मध्ये हे धोरण अमलात आणल्यानंतर थकीत वीजबिलावर सुरुवातीला 50 टक्के सूट देण्यात आली होती. त्यानंतर 1 एप्रिल 2022 पासून 30 टक्के सवलत दिली. आता या 30 टक्के सवलतीची मुदत 31 मार्च 2023 रोजी संपणार आहे.
Electricity Bill

काय आहे योजना ?
31मार्चपर्यंत मुदत
- महावितरणच्या वतीने कृषी धोरण-2020 राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना मिळणारी थकबाकीमुक्तीची सवलत ही 31 मार्चपर्यंतच राहणार आहे.
- कृषी धोरणात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज व विलंब आकारात माफी, तर सुधारित थकबाकीतही 30 टक्के सूट देण्यात आली आहे.