Electricity Bill Payment : या महिन्यात दोनवेळा भरा लाईट बिल.!

Electricity Bill Payment : परिमंडळातील वीजग्राहकांना माहे एप्रिल / मे महिन्याच्या वीजबिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. या अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या रकमेचा वीजग्राहकांनी भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. दरम्यान, वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास महावितरणकडून जास्तीत जास्त सहा समान मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याबाबतचा संदेश सुरक्षा ठेवीच्या बिलावर नमूद करण्यात आला आहे.

हे वाचा : तुमच्या मुलाची शाळा बोगस तर नाही ना ? या कागदपत्रांची करा विचारणा ?

एका वर्षातील सरासरी वीज वापराच्या आधारे अतिरिक्त त सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाने केली आहे.

Electricity Bill Payment

👇 👇 👇

लाईट बिल ऑनलाईन देखील भरता येते
इथे क्लिक करून भर
मासिक बिलाच्या दुप्पट ठेव
  • महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता 2021 च्या विनियम 13.1 नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार त्याचप्रमाणे विनियम 13.11 नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दराच्या समान व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना अदा करण्यात येते.

Leave a Comment