Falbag Lagwad Yojana : फळबाग लागवडसाठी ५.८८कोटींचे अनुदान.

Falbag Lagwad Yojana

जर तुम्हाला फळबाग लागवड (falbag lagwad yojana) करायची असेल तर तुम्ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग लावगड योजना २०२२-२३ अंतर्गत अर्ज करण्यासाठी महा-डीबीटी पोर्टलवरील संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.

त्यासाठी अर्जदाराचे आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक असणार आहे. या अंतर्गत ठिबक सिंचनासाठी सुद्धा ऑनलाईन संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात. या साठी ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडून त्यात आवश्यक ती माहिती भरावी.

Falbag Lagwad Yojana

सोलापूर जिल्ह्यासाठी (falbag lagwad yojana) या योजेअंतर्गत पाच कोटी ८७ लाख ७२ हजार रु. इतका निधी मंजुर झाले आहे. त्यातून जवळपास ५०० ते ६०० हेक्टरवर फळबाग लागवड करता येईल.

अर्जदार शेतकऱ्याने पहिल्यांदा वापरकर्त्याचे नाव (User Name) आणि संकेतशब्द (Password) तयार करावा.

खाते उघडल्यानंतर अर्ज करण्यासंदर्भात ‘युजर मॅन्युअल’द्वारे सर्व माहिती देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यानं २० रुपयांचे शुल्क व ३.६० रुपयांची GST, असे एकूण २३.६० रुपये ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.

त्यानंतर महा-डीबीटी महामंडळाकडे शेतकऱ्यांचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पाठवलं जातो. अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांनी संपूर्ण माहिती पुन्हा एकदा पडताळून पहावी.

अर्जदार शेतकऱ्याने अर्जात नमूद केलेल्या सर्व माहिती नुसार पूर्वसंमती रकमेच्या मर्यादेत अनुदान देण्यात येतं असल्याने अर्जातील सर्व माहिती अचूक असावी.

या योजेनेअंतर्गत एकूण १६ बहुवार्षिक फळपिकांना अनुदान मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी ३० नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे अपेक्षित आहे.

फळबाग लागवड योजना कागदपत्रे

  • आठ-अ उतारा.
  • आधार कार्ड.
  • बॅंक खाते.
  • सातबारा.

हेक्टरी अनुदान :

या योजेअंतर्गत थोडसं वैयक्तिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिलं जातो, संयुक्त उतारा असल्यास संमतीपत्राचे बंधनकिमान २० गुंठे ते १५ एकरापर्यंत क्षेत्रधारक शेतकऱ्यांना घेता येईल योजनेचा लाभक्षेत्राच्या मर्यादेत शेतकरी एकापेक्षा अधिक फळपिके लागवड करू शकतो.

राज्य रोजगार योजनेअंतर्गत दोन हेक्टरपर्यंत लाभ घेतला असल्यास उर्वरित क्षेत्रासाठी लाभ घेता येईल. आंबा, डाळिंब, चिकू, पेरू, काजू, लिंबू, मोसंबी, संत्रा, नारळ, सिताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, कोकम, फणस व अंजिर पिकांचा समावेश फळपिकानुसार हेक्टरी अनुदान दिले जाते.

लाभार्थी निवड :

लाभार्थी निवड ऑनलाइन लॉटरी पध्दतीने केली जाते. ३० नोव्हेंबर पर्यत अर्ज करण्याची मुदत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने (falbag lagwad yojana) अंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रती अनुदान दिले जाते.

राज्यात फळबागांचे क्षेत्र वाढावे, शेतकरी सक्षम व्हावा या हेतूने ही योजना दरवर्षी राबविली जाते. आता त्यासाठी अर्ज करण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे.

शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा ऑनलाइन पध्दतीने http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Leave a Comment