Farmer CIBIL Score : पीककर्जासाठी सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर गुन्हा नोंदवा.

Farmer CIBIL Score : ‘‘शेतकऱ्यांना पीककर्जासाठी बँकांनी ‘सिबिल स्कोअर’चे निकष लावल्यास बँकांवर तत्काळ फौजदारी कारवाई करावी,’’ असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

हे वाचा : ठिंबक सिंचनासाठी मिळणार 80 टक्के अनुदान, अर्ज कुठे करायचा ?

फडणवीस म्हणाले, ‘‘काही बँकांनी विविध योजनांच्या अनुदानाचे पैसे कर्जखात्यात टाकल्यास त्यावर तत्काळ कारवाई व्हावी. जलयुक्त शिवार योजनेचे काम मे महिनाअखेरपर्यंत पूर्ण करावीत. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना प्रभावीपणे राबवावी. वादळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्याचा निधी वितरित होत आहे. उर्वरित दोन टप्प्यातील निधीही तत्काळ वितरित करण्यात येईल.’’

Farmer CIBIL Score

‘…तर विमा कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करा’
  • ‘‘विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात टाळाटाळ करीत असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. जिल्ह्यात नियोजनानुसार आवश्यकतेपेक्षा अधिक बियाणे उपलब्ध आहे. जिल्ह्यात एकूण वाहितीखालील क्षेत्र 7.81 लाख हेक्टर आहे. खरीप क्षेत्र 6.81 लाख हेक्टर आहे,’’ असेही फडणवीस म्हणाले.

Leave a Comment