Fertilizer Rates : खताच्या दरात दिलासा कधी ?

Fertilizer Rates : कोरोना लॉकडाउन त्यानंतर सुरू झालेले रशिया-युक्रेन युद्ध यामुळे रासायनिक खते (Chemical fertilizers) तसेच त्यासाठीच्या कच्च्या मालाची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे जागतिक बाजारात रासायनिक खतांच्या किमती प्रचंड वाढल्या. लॉकडाउनपूर्वीही केंद्र सरकारकडून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या किमती वाढविण्याचे सत्र सुरू होते.

हे वाचा : यंदा मॉन्सून उशिरा दाखल होणार, ‘स्कायमेट’ संस्थेचा अंदाज.

2016 मध्ये रासायनिक खतांच्या अनुदानात केंद्र सरकारने मोठी कपात केली होती. त्यामुळे विविध प्रकारच्या रासायनिक खतांच्या किमती प्रतिबॅग 100 ते 170 रुपयांनी वाढल्या. 2017 मध्येही जीएसटीच्या घोळात ऐन खरिपात कंपन्यांनी खतांचे दर वाढविले.

Fertilizer Rates

फेब्रुवारी 2018 मध्ये युरिया वगळता संयुक्त खतांच्या किमतीत प्रतिबॅग 64 ते 134 रुपये तर 2019 मध्ये देखील युरिया वगळता संयुक्त खतांच्या किमतीत प्रतिबॅग 100 ते 217 रुपये दरवाढ करण्यात आली.

त्यामुळे रासायनिक खतांच्या किमती कमी करा, अशी मागणी शेतकरी, त्यांच्या संघटनांनी लावून धरली आहे. महत्त्वाचे म्हणजे जागतिक बाजारात रासायनिक खतांच्या (युरिया, एमओपी, डीएपी, पालाश) तसेच त्यासाठीच्या कच्च्या मालाच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.

आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा !
येथे क्लिक करून

Leave a Comment