FIFA World Cup : अर्जेंटिनाच्या मेस्सीच्या नावे फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा वगळता फुटबॉल विश्वातील जवळपास सगळी विजेतेपदं आहेत. 2006 पासून आपलं नशीब आजमावत मेस्सी पाचव्यांदा वर्ल्डकप स्पर्धा खेळत आहे. शिवाय, यंदाची वर्ल्डकप स्पर्धा मेस्सीची शेवटची स्पर्धा मानली जात आहे. दरम्यान रँकिंगमधील सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडूंची यादी पाहूया…
FIFA World Cup
यंदाच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना काल पार पडला. जगभरातील फुटबॉल चाहत्यांचं लक्ष या सामन्याकडे आहे, कारण लिओनेल मेस्सीचं फुटबॉल वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न फक्त एक पाऊल दूर आहे. अर्जेंटिनाने फायनल सामन्यात फ्रान्सचा (FIFA WorldCup) पराभव करत थरारक विजय मिळवला.
श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यामध्ये अर्जेंटिनाचा (Argentina) विजय झाला पण फ्रान्सनेही (France) तितकीच कडवी झुंज दिली. या सामन्यानंतर सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडू कोण आहे? यानिमित्ताने फुटबॉलच्या इतिहासातील सर्वोत्तम 5 फुटबॉल पटूंवर एक नजर टाकूया…
1) लिओनेल मेस्सी (Lionel Messi)

अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने फ्रान्स विरूद्धच्या फायनल सामन्यात 23 व्या मिनिटाला पेनाल्टीवर गोल केला. याच मिनिटाला लिओनेल मेस्सीने इतिहास रचला. असा इतिहास फिफा वर्ल्डकप इतिहासात कोणालाही रचता आला नव्हता.
आता मेस्सीने आपल्या शेवटच्या वर्ल्डकपमध्ये ग्रुप स्टेज, राऊंड ऑफ 16, क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनलमध्ये गोल केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. तसेच मेस्सीने क्लब आणि देशासाठी 1,002 खेळांमध्ये 791 गोल आणि 350 सहाय्य केले आहेत. ते प्रति ध्येय योगदान 72 मिनिटांवर कार्य करते. दर 72 मिनिटांनी. 18 वर्षांच्या कारकिर्दीत करून दाखवलं आहे.
2) दिएगो अर्मांडो मॅराडोना (Diego Armando Maradona)

दिएगो अर्मांडो मॅराडोना यांच्या निधनाने जगाने एक महान फुटबॉलपटू, एक महान मार्गदर्शक गमावलाच पण जगभराला फुटबॉलचे वेड लावणारा एक अवलियाही गमाविला.
आकडेवारीच सांगायची, तर 91 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 34४ गोल, बार्सिलोना क्लबने केलेला 50 लाख पौंडचा विश्वविक्रमी करार, नेपोली क्लबने केलेला 70 लाख पौंडांचा करार आणि 21 वर्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीत नोंदवलेले अडीचशेहून अधिक गोल ही नोंद तर इतिहासात कायमच राहील.
3) ख्रिस्तियानो रोनाल्डो (cristiano ronaldinho)

ख्रिस्तियानो रोनाल्डो हा पोर्तुगालमधीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक 118 गोल केले आहेत. सध्या जगातील कोणताही खेळाडू त्याच्या या विक्रमाच्या आसपास नाही.
रोनाल्डोनं पोर्तुगाल फुटबॉल संघासाठी 196 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे, पोर्तुगालच्या संघाला अद्याप एकदाही फुटबॉल विश्वचषकावर नाव कोरता आलं नाही. यंदाचं विश्वचषक जिंकून ख्रिस्तियानो रोनाल्डोला खास निरोप देण्याचा पोर्तुगालच्या संघाचा प्रयत्न होता. परंतु, मोरोक्कोच्या संघानं पोर्तुगालच्या स्वप्नांवर पाणी फेरलं.