Food Security Card : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधील 40 लाख लाभार्थीना स्वस्त दरात धान्य देण्याची योजना बंद करण्यावरून नाराजीचे सूर उमटले असताना आता धान्याऐवजी लाभार्थीच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याची योजना आखण्यात आली आहे.
हे वाचा : 50 हजारांचे अनुदान या दिवसांत होणार खात्यात जमा.
59 हजार ते एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून देण्याची योजना सुरू केली आली होती. केंद्र सरकार त्यासाठी धान्य देत होते, ते बंद करण्यात आल्याने या लाभार्थीना जुलै 2022 पासून गव्हाचे, तर सप्टेंबर 2022 पासून तांदळाचे वाटप बंद करण्यात आले होते.
Food Security Card
कोणते 14 जिल्हे यासाठी पात्र ठरणार आहेत
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
कसे मिळतील पैसे ?
कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात सर्वांचे पैसे जमा करण्याचेही विचाराधीन आहे. लाभ मिळण्यासाठी आधार संलग्न असणे अनिवार्य असेल.
काय आहे योजना ?
एका व्यक्तीला महिन्याकाठी 150 रुपये म्हणजे वर्षाकाठी 9 हजार रुपये देण्याचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
36,000 रु. वर्षाला
- 4 जणांच्या कुटुंबाला वर्षाकाठी 36 हजार रुपये मिळतील. या कुटुंबांना या पैशांतून बाजारामधून गहू, तांदळाची खरेदी करता येईल.
- ती गरज भागून वाचलेला पैसा अन्य गरजा भागविण्यासाठीही वापरता येईल.