Free Ration Scheme : केंद्र सरकारने नुकतेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत देशभरातील 81.35 कोटी लाभार्थ्यांना 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत म्हणजेच पुढील 1 वर्ष मोफत राशन देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केंद्र शासन 2 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. आता केंद्र शासन 1 जानेवारी 2023 पासून नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेचा प्रारंभ करणार आहे, त्या बद्दलची सविस्तर माहिती…..
एकात्मिक योजनेअंतर्गत दोन अन्न अनुदान योजना समाविष्ट
- 2023 या वर्षासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवण्याची नवीन योजना.
- गरीब आणि दुर्बल गटातल्या लोकांसाठी अन्नधान्याची सुलभता, किफायतशीर दर आणि उपलब्धतेच्या बाबतीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा , 2013 च्या तरतुदी मजबूत करण्यासाठी योजना.
Free Ration Scheme
केंद्र शासनाच्या नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेचा (Free Ration Yojana) प्रारंभ 1 जानेवारी 2023 पासून होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, नवीन योजना 2023 या वर्षासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवेल. ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावी आणि एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करेल.
आता एक वर्ष मोफत राशन मिळणार, सविस्तर माहितीसाठी –> येथे क्लिक करा
या संदर्भातील सविस्तर प्रसिद्धीपत्रक वाचण्यासाठी –> येथे क्लिक करा