Gal Mukt Dharan : शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यासाठी मिळणार अनुदान.

Gal Mukt Dharan : राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची शेतजमिनी भूर्गळ, खडकाळ, नापीक आहेत. अशा शेतकऱ्यांनी जर त्यांच्या शेतात काळी माती किंवा तळ्यातील गाळ टाकल्यास जमीन सुपीक होऊ शकते. शेतात गाळ टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. सामान्य शेतकऱ्याला हा येणारा खर्च परवडण्याजोगा नसतो. त्यामुळे राज्य शासनाने मागेल त्याला गाळ या नावाने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हि योजना सुरु केली आहे.

हे वाचा : शेतकऱ्यांसाठी आता मागेल त्याला योजना मिळणार.

या योजनेमध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना तळ्यातील गाळ त्यांच्या शेतामध्ये टाकण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येईल. बहुभधारक शेतकऱ्यांना स्वखर्चाने गाळ त्यांच्या शेतात वाहून न्यावा लागेल. सदर योजनेची कार्यपद्धती खालील मुद्द्याच्या आधारावर राबविण्यात येईल. ज्यामध्ये अद्यायावत तंत्रज्ञानाचा वापर, अनुदान मर्यादा, मूल्यमापन, शेतकऱ्यांची निवड प्रक्रिया इत्यादी बाबीचा समावेश असेल.

Gal Mukt Dharan

मागेल त्याला गाळ योजनेचं
शासन निर्णय येथे पहा

अनुदान मर्यादा
  • शेतकऱ्यांना टाकण्यात आलेल्या गाळाच्या रु. 35.75 प्रति घनमीटरप्रमाणे एकरी 15,000 रु. च्या मर्यादेत म्हणजेच एकरी 400 घनमीटर गाळाच्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. उच्चतम अनुदान मर्यादा अडीच एकरपर्यंत लागू असेल, म्हणजेच जास्तीत जास्त 37,500 रु. इतकंच अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येईल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा

Leave a Comment