Garpit Nuksan Bharpai : जिल्ह्यात दोन लाख शेतकऱ्यांना मिळणार भरपाई !

Garpit Nuksan Bharpai : सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुषंगाने नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाला दिले.

हे वाचा : सौरपंपासाठी तुम्ही अर्ज केलाय का ? आजपासून सुरु.

या पार्श्वभूमीवर गेल्या सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये सतत पाऊस बरसल्याने अकोला जिल्ह्यात 1 लाख 37 हजार 832 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेल्या 2 लाख 442 शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Garpit Nuksan Bharpai

असे आहे पीक नुकसान

पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत देण्यासाठी 204 कोटी 93 लाख 26 हजार 288 रुपयांच्या अपेक्षित निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. परंतु सततच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई देण्याचा मुद्दा प्रलंबित होता. सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्यात आले असून नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग सुकर झाला.

Leave a Comment