Gas Cylinder Price : सर्वसामान्यांच्या खिशाला घरगुती गॅस दरवाढीचा चटका.

Gas Cylinder Price : महागाईने आधीच सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरचे दर 50 रुपयांनी वाढले आहेत. ही दरवाढ करण्यात आल्याने सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. यामुळे महिन्याचं बजेट भागवता भागवता गृहिणींच्या नाकीनऊ येणार आहे. यामुळे गॅस दरवाढीची झळ सर्वसामान्यांच्या खिशाला लागली आहे.

घरगुती सिलिंडरचे नवे दर
पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मार्च महिना सुरू होताच पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. नव्या दरानुसार, 1 मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर 50 रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही तब्बल 350 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना बसलेला हा मोठा धक्का आहे.

Gas Cylinder Price

हे वाचा : 37 लाख रेशन कार्ड धारकांना धान्याऐवजी मिळणारं पैसे.

घरगुती गॅस सिलिंडरचे दर 50 रुपयांनी वाढवण्यात आल्याने मुंबईत 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत आता एक हजार 129 रुपये इतकी झाली आहे. बुधवारपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरपाठोपाठ व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही तब्बल 350 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Leave a Comment