Gat Vatap Yojana : वंचित गटातील पशुपालकांना स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध ह्यावे, यासाठी राज्यात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांच गट वाटप करण्यात येणार आहे. ही योजना राज्यात राबविण्यात येत असून प्रति लाभार्थी 02 दुधाळ जनावरांचा एक गट 75 टक्के अनुदानावर (Subsidy) वाटप केला जाणार असून, यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
हे वाचा : शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यासाठी मिळणार अनुदान.
योजनेअंतर्गत अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांना 02 दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करण्यात येईल. ज्यामध्ये गाय गटासाठी 75 टक्के म्हणजेच रु. 1,17,638/- किंवा म्हैस गटासाठी रु. 1,34,443/- शासकीय अनुदान देय राहील. अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित 25% रक्कम लाभार्थ्यास स्वतः उभारावी लागेल किंवा बँक/वित्तीय संस्थेकडून कर्ज (loan) घेणाऱ्या (5 टक्के लाभार्थी हिस्सा व 20 टक्के बँकेचे कर्ज) याप्रमाणे लाभार्थ्यास योजनाअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल.
Gat Vatap Yojana

गाय म्हशी वाटप अनुदान
इथे क्लिक करून पहा
लाभार्थी निवडीसाठी पात्रता
- अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमातीतील असावा.
- दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना प्राधान्य.
- अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्यंतचे भूधारक)
- अर्जदार सुशिक्षित बेरोजगार असावा.
- महिला बचत गटातील लाभार्थी