Goat Farming Scheme : शेळी पालना करिता अनुदान योजना सुरु.

Goat Farming Scheme : शेळी पालन (Goat Sheep Rearing) क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योजक निर्माण करून शेळ्याच्या जातींचा (Goat Breed) विकास करण्यासाठी शेळ्याचे पैदास प्रकल्प स्थापन करणे ही योजना (Sheep Goat Scheme) केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत सन 2022-23 मध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे.

या योजनेमध्ये 100 ते 500 शेळ्याचे पैदास प्रकल्प स्थापन करण्यासाठी प्रकल्पाच्या भांडवली खर्चावर 50 टक्के अनुदान देण्यात येते. उर्वरित निधी कर्ज स्वरूपात बँक किंवा वित्तीय संस्थेमार्फत किंवा स्वनिधीमधून उपलब्ध करावयाचा आहे.

Goat Farming Scheme

अर्थसाह्याचे स्वरूप

अर्थसाह्याचे स्वरूप खाली दर्शविल्यानुसार दोन समान हप्त्यांमध्ये प्रकल्पाच्या भांडवली खर्चावर 50 टक्के अनुदान देण्यात येते.

  • 100 (शेळ्या) + 5 (बोकड) 10 लाख.
  • 200 (शेळ्या) + 10 (बोकड) 20 लाख.
  • 300 (शेळ्या) + 15 (बोकड) 30 लाख.
  • 400 (शेळ्या) + 20 (बोकड) 40 लाख.
  • 500 (शेळ्या) + 25 (बोकड) 50 लाख.

राज्य अंमलबजावणी एजन्सीने शिफारस केल्यानंतर आणि बँक किंवा वित्तीय संस्था यांनी कर्जाचा पहिला हप्ता लाभार्थ्याला वितरित केल्यानंतर, शासनामार्फत अनुदानाची 50 % रक्कम लाभधारकांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

इथे क्लीक करून आवश्यक कागदपत्रे पहा.

बाकी ५० % अनुदानाची रक्कम प्रकल्प पूर्ण होऊन राज्य अंमलबजावणी एजन्सीने शिफारस केल्यानंतर लाभधारकांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

योजनेचा उद्देश
  • बंदिस्त शेळी, मेंढीपालनास प्रोत्साहन.
  • शेळी पालन क्षेत्रामध्ये नवीन उद्योजक निर्माण करणे.
  • शेळी पालन व्यवसायाचे शाश्‍वत मॉडेल विकसित करणे.
  • एकात्मिक ग्रामीण शेळी उत्पादन साखळी विकसित करण्यासाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था यांना प्रोत्साहन मिळेल.
  • शेळी पालन व्यवसायाच्या शास्त्रोक्त संगोपन पद्धतीचा तसेच पोषण, आहार आणि रोग प्रतिबंध इत्यादींबाबत जागरूकता निर्माण करणे.

योजनेमध्ये अर्ज करण्याससाठी इथे क्लीक करा

Leave a Comment