Harbhara kharedi : शासकीय केंद्रांवर खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना 800 ते 1000 रुपयाने कमी भावात हरभऱ्याची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे हरभऱ्याची हमीभावाने खरेदी कधी सुरू होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित होतात. आता हरभरा खरेदीला मुहूर्त मिळाला आहे.
हरभऱ्याचे बाजारभाव
इथे क्लीक करून पहा
हमीभावाने हरभरा खरेदी (gram) सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकाराक आहे. ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी दि. 27 फेब्रुवारी 2023 पासून नोंदणी करता येणार आहे, असे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Harbhara kharedi
हरभरा पिकाची सध्या सोंगणी सुरू आहे. शेतकन्याचा हरभरा बाजारात येत आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत दि. 24 फेब्रुवारी रोजी 4,548 क्विंटल आवक झाली. हरभन्याला बाजारात सरासरी भाव हा 4 हजार 400 रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. हरभऱ्याचे शासकीय हमीभाव 5,330 रुपये असून, शेतकऱ्याचे प्रतिक्विंटल 800 ते 1000 रुपयांचे नुकसान होत आहे.
हरभऱ्याचे बाजारभाव
इथे क्लीक करून पहा
1.21 लाख हेक्टर क्षेत्राक हरभऱ्याची पेरणी
- जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभयाल पसंती मिळते. या वर्षी मुबलक पाण असल्याने जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढले असून, हरभऱ्याचे पेरणी 128 टक्के झाली आहे.
- जिल्ह्यात 1 लाख 21 हजार 177 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. सध्या हरभरा पिकाची काढणी सुरु असून, उत्पादनात झाल्याचे दिसून येत आहे.