Horticulture Loan : फळपिकांसाठी घ्या हेक्टरी 46 हजार कर्ज मिळणार.!

Horticulture Loan : खरीप आणि रबीसाठी राज्यात पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट जिल्हा बँकेने निश्चित केले आहे. केळीसाठी हेक्टरी 15 हजार तर बागायती कापसासाठी 46 हजार रुपये कर्ज वितरीत केले जाणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा बँकेने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बहुतेक पिकांच्या (Crop Loan) कर्जवाटपाची मर्यादा वाढवली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली असून, या वर्षांत शेतकऱ्यांना वाढीव पीककर्ज मिळणार आहे.

हे वाचा : बाप रे ! शेणखताला आला सोन्याचा भाव, आता उकिरड्यातून कमवा सोने.

पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने तीन लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिले. एक लाख ते तीन लाखांच्या कर्जमर्यादित विहीत मुदतीत कर्जाची (Crop Loan) परतफेड केल्यास एक टक्का व्याजदरासह आणखी दोन टक्के व्याजदर सवलत देण्यात येत होती, मात्र केंद्र सरकारने परिपत्रक काढल्याने यावर कोणताही निर्णय अजून तरी बँकेने घेतलेला नाही.

Horticulture Loan

👇 👇 👇

फळ पिकांसाठी कर्ज ?
इथे पहा

यंदा 900 कोटींचे उद्दिष्ट
  • यंदा आतापर्यंत 90 हजार शेतकऱ्यांना 450 कोटी रुपयांचे कर्ज (Loan) वाटप झालेले आहे. जूनअखेरपर्यंत दीड लाखापेक्षा जास्त शेतकन्यांना 900 कोटीपर्यंत कर्जवाटप केले जाईल, अशी माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी दिली.

Leave a Comment