Horticulture Scheme : फळबाग लागवड योजनेला 100 टक्के अनुदान.

Horticulture Scheme : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (Employment Guarantee Scheme) शेतकऱ्यांना फळबाग लागवडीकरिता शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान देण्यात येत आहे.

हे वाचा : पोकरा योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (Bhausaheb Phundkar Phalbag Lagawad Yojana 2023) ही राज्य सरकारच्या अशाच योजनांपैकी एक आहे. ही योजना राज्यात 2018-19 मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना राज्य सरकारच्या योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जात आहे.

Horticulture Scheme

👇 👇 👇

योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करायचा

योजनेसाठी अनुदान
  • फळबाग लागवड योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना मंजूर अनुदान वेगवेगळ्या टप्प्यांत दिले जाते. पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के देण्यात येणार आहे.
  • दुसऱ्या व तिसऱ्या वर्षात अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांच्या जीविताचे प्रमाण बागायतीसाठी 90 टक्के तर कोरडवाहूसाठी 80 टक्के असणे गरजेचे आहे.
  • हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्याला स्वखर्चाने झाडे आणून जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे ठेवावे लागेल. अशाप्रकारे लाभार्थी शेतकऱ्याला तीन वर्षांत 100 टक्के अनुदान मिळणार आहे.

Leave a Comment