Sugar Control : साखर नियंत्रित ठेवण्यासाठी पिवळी ज्वारी खा.

Diabetes Sugar Control : मधुमेह हा झपाट्याने पसरणारा आणि गंभीर आजार आहे. दुर्देवाने मधुमेहावर कायमस्वरूपी कोणताही उपचार नाही, पण निरोगी आहार आणि मध्यम व्यायामाचे पालन केल्यास मधुमेह (Diabetes Control) नियंत्रणात ठेवता येतो. मधुमेहामुळे रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते, ज्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अशातच मधुमेहींसाठी ज्वारी ही अत्यंत आरोग्यदायी आहे.

विशेषत : पिवळी ज्वारी आणखी उपयोगी असल्याचे तज्ज्ञ सांगतात, जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल, तर त्याला खाण्यापिण्याची खूप काळजी घ्यावी लागते. कारण पौष्टिक खाद्यपदार्थ न खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. साधे घरगुती जेवण बनवून आणि योग्य आहाराची निवड करून मधुमेह नियंत्रित (Diabetes Control) करणे शक्य होऊ शकते.

Sugar Control

मधुमेहींना ज्वारी आरोग्यदायी
  • मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज्वारी उपयुक्त ठरते. शरीरातील इन्शूलिनची पातळी प्रमाणात ठेवण्यास ती मदत करते.
पिवळी ज्वारी आणखी चांगली
  • ज्वारीच्या जवळपास 30 प्रजाती आहेत. त्यात पिवळी ज्वारी चव आणि आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. ज्वारीमध्ये टेनिन नावाचे तत्त्व असते. ते एन्झाईम्स निर्मितीवर नियंत्रण ठेवते.
ज्वारीच्या फायद्यांबाबत डॉक्टर म्हणतात…
  • मधुमेह नियंत्रणासाठी ज्वारीचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते, ज्वारीमध्ये असणाऱ्या खनिज पदार्थांचे आणि तंतुमय पदार्थाचे प्रमाण अधिक असून, त्यांचा उपयोग मधुमेह कमी करण्यासाठी होतो.

Leave a Comment