HSC Result 2023 : सीबीएसई बोर्डाचा निकाल लागल्यानंतर आता त्यामागोमागच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षांचे निकाल नेमके कधी लागणार याबाबतचे प्रश्न विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
हे वाचा : मोबाईल हरवला फोन पे, गुगल पे, पेटीएम असे करा ब्लॉक.
पुढच्या आठवड्यापर्यंत राज्यातील HSC परीक्षांचे निकाल नेमके कधी लागणार याबाबतची तारीख जाहीर केली जाऊ शकते. दरम्यान, शिक्षण मंडळाकडून मात्र याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. असं असलं तरीही आतापासूनच कोणत्या लिंकवर निकाल पाहता येईल, पर्यायी संकेतस्थळं कोणती हे आणि असे अनेक प्रश्न डोकं वर काढताना दिसत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या अखेरीपासून जूनच्या पहिल्या दहा दिवसांपर्यंत बारावीच्या परीक्षांचे निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
HSC Result 2023

निकाल कसा पाहायचं ?
इथे पहा निकाल
- बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल https://www.mahahsscboard.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहेत. शिवाय mahresult.nic.in, hscresult.mkcl.org या संकेतस्थळांवरही निकाल पाहता येणार आहेत.