HSC Result : बारावीच्या निकालात मुलींची छाप, मुलांचा निकाल 89.46 तर मुलींचा निकाल 94.46%

HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत राज्यातील मुली यंदाही हुश्शार ठरल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकूण निकालची टक्केवारी कमी असली तरी मुलींच्या निकालाचा टक्का वाढला आहे.

हे वाचा : तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत ? असे तपास …

तालुक्यात इगतपुरी, नाशिक, सुरगाणा या तीन तालुक्यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण केवळ 80 ते 82 टक्के असून मुलींनी मात्र कळवण वगळता सर्वत तालुक्यांमध्ये नव्वदी गाठली आहे. मालेगाव महापालिका हद्दीतच 91 टक्के मुले तर केवळ 80 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.

HSC Result

इथे पहा : बारावीचा निकाल

बारावीच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली होती. गुरुवारी (दि. 25) राज्य मंडळाने अधिकृतपणे दुपारी 2 वाजता निकाल जाहीर केला. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता आला. गतवर्षीच्या तुलनेत विभागाच्या निकालात घसरण झाली असली तरी मुलींच्या उत्तीणतिचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे.

बोडांच्या परीक्षेत मुलीच सातत्याने बाजी मारत असल्याची परंपरा या वर्षीच्या निकालातही दिसून आली. शहर, ग्रामीण अशा सर्व ठिकाणी मुलीनी आपल्या नावाची मोहोर उमटवली. या निकालात मुलींनी मुलांपेक्षा थोडे अधिकचे यश मिळवत बाजी मारली. विभागातील मुलींच्या निकालाची टक्केवारी 94.46 टक्के इतकी आहे, तर मुलांना निकाल 89.46 टक्के इतका लागला.

Leave a Comment